मोक्ष मिळणे म्हणजे नेमके काय ?

 मोक्ष मिळणे म्हणजे नेमके काय ?



मोक्ष ही शरीर आणि मनापलीकडची एक अनुभूती आहे. तुम्ही शरीराचा अनुभव घेतलाय, विचार आणि भावना अनुभवता म्हणजे मनाचा पण अनुभव घेतलाय. आता यांच्या आत अजून एक अनुभव आहे. त्याला मी काही नाव देणार नाही कारण नाव दिल्यावर त्याचे चुकीचे आडाखे चालू होतात. मी फक्त इथे अनुभव देते.

त्याचे सुरुवातीचे अनुभव आपणास अत्यंत हलकेफुलके पणाची जाणीव कधी होते त्यापासून सुरू होते. कधी व्यायाम, योगासने केल्यावर आपल्याला एकदम फ्रेश वाटले आहे, तेव्हा लक्ष देऊन निरीक्षण करा. शरीराबरोबर आपण जरा हलकेफुलके झालो आहोत असा अनुभव येतो. झोपेमध्ये नुकताच प्रवेश करत असताना किंवा गाढ झोपेतून किंचित जागे झाल्यावर आपल्याला शरीरापासून लांब पण कुठल्यातरी हलक्या जगात प्रवेश केल्याचे जाणवते. कधी आपल्या शरीराचे एखादे अंग दुखत असेल, पण त्यातच आपल्याला झोप येत आहे, तेव्हा अनुभव घेतलात, तर स्पष्ट लक्षात येईल. दुखणं आणि शरीर थोडं लांब गेलयं आणि आपण थोड्या काळासाठी त्यांच्यापासून मुक्त अश्या वेगळ्याच जगात प्रवेश मिळवलाय. उठल्यावर परत शरीर आणि दुखणं परत येते, नाहीतर ते दुखणं बरं झालेलं असत. हे जे अनुभव सांगितलेय मी, हे ज्यांनी आयुष्यात कधीच ध्यान किंवा अध्यात्मामध्ये काहीच केले नाही त्यांनाही आलेले असे सांगितले.

जी लोक ध्यान किंवा योगासने नियमित करतात, ते माझ्या उत्तराशी जास्त relate करू शकतील. ध्यानाने ही हलकेफुलके पणाची अनुभूती जास्त खोल होत जाते. एकाच वेळी शरीर आणि त्याला जोडलेले हे हलकेफुलके ऊर्जा शरीर एकाच वेळी अनुभवायला यायला लागते. त्याच बरोबर भरपूर शांती आणि आंनद पण अनुभवायला मिळतो. एक रहस्य पण उलघडते, की शरीराला होणारी दुखापत यापासून वाचण्यासाठी आपल्या आतमधेच अजून एक खोली आहे, जिथे आपण विश्रामला जाऊ शकतो. मनाच्या कल्लोळाला तिथून खुदकन हसत पाहू शकतो.

मोक्ष म्हणजे ह्या तिसऱ्या खोलीचा पत्ता सापडणे. आणि ज्या भाग्यवाणाला तो याची देही तो सापडला, तर सगळ्यात मोठी लॉटरी लागली असे समजा. त्या क्षणी मृत्यूचे भय संपले. त्याला जगातली कुठलीच गोष्ट दुःखी करू शकणार नाही. तिथे फक्त आनंद आणि शांतीचा कधी न संपणारा महासागर आहे.

कसा मिळवायचा हा मोक्ष? जागृत राहून. चिकित्सक वृत्ती असेल तर ध्यान करा, जास्त भावनिक असाल तर भक्ती करा, आत्ताच काही समजत नसेल तर अध्यात्माचे वाचन करा. एक दिवस तुम्हाला जमेल असा मार्ग नक्की सापडेल. अवघड आहे की सोप्प ह्या गणितात पडू नका. त्या जाणिवेचे रोज काही glimpses मिळतील म्हणून रोज काही न काहीतरी करत राहा, व्यायाम, योगासने, ५ मिनिटांचे ध्यान, मनापासून आवडलेले एखादे भजन यामधून थोडे थोडे glimpses मिळतात. अंतिम उद्दिष्टाचा लोड आत्ताच घेऊ नका.....


Download Book Now 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें